बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक टी.टी. जुलमे यांची पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपुस करून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली.
मागील काही महिण्यांपासून टी.टी. जुलमे यांचे स्वास्थ्य खराब असल्याने हंसराज अहीर यांनी त्यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. यावेळी त्यंाच्या पत्नीशी सुध्दा प्रकृतीविषयी चर्चा केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या पौराणीक इतिहासाला आपल्या संशोधक वृत्तीने उजागर करीत जुलमे यांनी हा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहचविला आहे. टपाल खात्याची नौकरी सांभाळुन त्यांनी परिश्रमपूर्वक हे कार्य केले. अनेक पुस्तकांचे लिखाणही त्यांच्या हातुन घडले आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांचा गौरव झालेला आहे.
अशा ज्येष्ठ संशोधक व विचारवंत अभ्यासकाच्या प्रकृतीला आराम लाभो अशा सदिच्छायुक्त भावना या भेटीप्रसंगी अहीर यांनी व्यक्त केल्या.