ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील क्वार्टर बांधकाम रिपेरिंग व इतर बांधकामात प्रचंड अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करावी!! आमदार डॉ देवराव होळी

 

 

       प्रतिनिधी // दीक्षा झाडे

चामोर्शी – 20 मार्च 2021

आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे सदिच्छा भेट दिली व येथील नवीन बांधकामाची पाहणी केली व

येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात नवीन बांधकाम करण्यात आलेल्या क्वार्टर व रस्ते* *नाली व रीपेरिंग कामात सबंधित ठेकेदार यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून चांगलाच* *मलाई लाटला आहे  परंतु सबंधित प्रशासनाने फक्त बघ्याची भुमिका बजावली समस्त इस्टीमेट धाब्यावर बसवून मनमर्जी ने काम केले आहे* *बांधकाम करताना सर्व साहित्य अती निकृष्ट दर्जाची वापरली आहे त्यामुळे पुन्हा लवकरच सदर सर्व कामांचे रिपेरिंग काम पुन्हा एकदा हस्तांतरण करण्याआधी करावे लागणार आहे

बांधकाम करताना वैदकीय अधीक्षक व कर्मचारी यांचे क्वार्टर

कोणत्याही कुटुंब संकल्पना नुसार नसून सर्व रचना ठेकेदाराच्या सोईनुसर करण्यात आले आहे

या बांधकाम मुळे शासनाला चागलाच चुना लागला आहे त्यामुळे या सर्व निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची तत्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ देवराव होळी यांनी केली व गडचिरोली विधानसभा मतदार संघातील समस्त निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेणार असे सांगितले यावेळी  वैदकीय अधिकारी शिवा कूमरे भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा , भाजपा तालुका उपाध्यक्ष जयराम चलाख , भाजपा युवा नेते प्रतीक राठी ,व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते