बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन निमीत्ताने दिनांक: 12/03/2021 रोजी घेण्यात आलेल्या रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण दिनांक: 19/03/2021 रोजी एका कार्यक्रमाद्वारा घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ए. बी. बघेल मुख्याध्यापक हे होते. प्रमूख पाहुणे श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, श्री. एन. एन. दुधबावरे ज्येष्ट शिक्षक, सौ. लता बंडू काकडे, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती हे होते. प्रमुख उपस्थिती सौ. एस. एन. लोधे मॅडम, कु. एस. एस. काळे मॅडम यांची होती. प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे फोटोला उपस्थित मान्यवरांचे हस्ते माल्यारपण व पूजन करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेत एकूण 11विद्यार्थी भाग घेतले होते. प्रथम क्रमांक- कु. महेक अफ्रिन अब्दुल रहेमान, द्वितिय क्रमांक- कु. सायमा शेख जावेद, तृतिय क्रमांक- करण देशराज केशकर, प्रोत्साहन- प्रणय कैलाश रामटेके तसेच रांगोळी स्पर्धा मधे एकूण 10 विद्यार्थी भाग घेतले होते. रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक- कु. नंदिनी पंढरी वनकर , द्वितिय क्रमांक- कु. परी राजेश उँजवाल, तृतीय क्रमांक- कु. वैश्नवी अनिल हजारे, प्रोत्साहन- कु. दीक्षा भास्कर वांढरे यांना मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे श्री. एम. डी. टोंगे सर यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण श्री. ए. बी. बघेल सर यांनी केले. प्रास्ताविक श्री. आर. के. वानखेडे, संचालन श्री. आर. बी. आलाम तर आभार श्री. एस. एम. चौव्हान यांनी मानले. फोटोग्राफी श्री. जे. आर. कांबळे यांनी बघीतली. कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.