जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर येथे पालक शिक्षक सभा संपन्न 

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर येथे दिनांक: 19मार्च 2021 रोजी सकाळी:10.00 वाजता दुसरी पालक शिक्षक सभा संपन्न झाली. कार्यकारनी गठीत करण्यात आली ती पुढीलप्रमाणे, 1) अध्यक्ष- श्री. ए. बी. बघेल ( मुख्याध्यापक), 2) उपाध्यक्ष- श्री. दिगांबर शंकर अडुरवार ( पालक प्रतिनिधि), 3) सचिव- श्री. आर. के. वानखेडे ( शिक्षक प्रतिनिधि), 4) सहसचिव- सौ. लता बंडू काकडे( पालक प्रतिनिधि), 5) सहसचिव- सौ. एस. एन. लोधे( शिक्षक प्रतिनिधि) 6) विद्यार्थी प्रतिनिधि- कु. नंदिनी पंढरी वनकर, 7) तसेच प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी व एक पालक सदस्य असतील. सदर कार्यकारिणी सत्र: 2020- 2021 साठीच आहे.