अवैध ताडी गुत्त्यावर छापा ; Dysp राहुल आवारे यांची कामगिरी.

 

 

खडकवासला पुणे येथे अवैध ताडी गुत्त्यावर छापा मारून विक्रेत्यासह 40 लिटर अवैध ताडी ताब्यात घेत प्रभारी Dysp, अर्जुनवीर पै.राहुल आवारे यांनी आपल्या पोलीस करियर पहिली दमदार कामगिरी केली आहे. खडकवासला धरण परिसरात दाट झाडीचा फायदा घेऊन अवैध ताडी विक्री होत असल्याची माहिती dysp राहुल आवारे यांना मिळाली.ताडीमध्ये क्लोरस हायट्रेट मिसळून भेसळयुक्त ताडी विक्री केली जाते. अश्या ताडीमुळे मानवी प्रकृतीवर घातक परिणाम होतो.अनेक लोकप्रतिनिधीकडून याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. पै.राहुल आवारे हे जागतिक कीर्तीचे मल्ल आहेत,भारत सरकारचा मानाचा अर्जुन पुरस्कार प्राप्त पैलवान आहेत. कुस्तीसोबत आता त्यांनी पोलीस प्रशासनात सुद्धा आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवण्यास प्रारंभ केल्याने महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात

 

त्यांचे कौतुक होत आहे.