सांज मल्टी एक्टिविटी संस्थेचा पुढाकार’ मोफत औषधि वितरण शस्त्रक्रिया झालेल्या ८१ नेत्ररुग्णांना मोफत चश्मे वाटप 

  विशेष प्रतिनिधी // पूजा दब्बा

        चामोर्शी :  सांज मल्टी एक्टिविटी डेवलोपमेन्ट इन्स्टीट्यूड यस्टर एरिया बिनागुंडा स्थित भामरागढ़ तथा लायंस आय सेंटर सेवाग्राम वर्धा, लायंस क्लब चंद्रपुर महावीर इंटरनेशनल चंद्रपुर यांच्या संयुक्त विधमाने नगरपंचायत सभागृह चामोर्शी येथे दिनांक १३ मार्च २०२१ शस्त्रक्रिया झालेल्या नेत्ररुग्णाकारिता फालोआप कैंप आयोजित करण्यात आला.शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची तपासणी करून ८१ नेत्ररुग्णांना मोफत चश्मे वाटप व औषधि वितरण करण्यात आली.यावेळी सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे नेत्रतद्न्य  डॉ अजय शुक्ला, डॉ कार्डेकर व त्यांची वैद्यकीय चमु उपस्थित होती.डॉ अजय शुक्ला यांनी उपस्थिताना डोळाची निगा कशी राखावी ?डोळाच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले .

         मौजा चामोर्शी येथे मागील ३ वर्षापासून नियमित विनामूल्य मोतिबिंदु शिबिराचे आयोजन करून शस्त्रक्रियेकरिता निवड झालेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करने व मोतिबिंदु शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत नंबरचे चश्मे वाटप व औषधि वितरण करने संस्थेचा या कार्याचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचा यशस्वितेकरिता विलास मेश्राम, सचिन मोहुर्ले, वैभव सोनटक्के, विलास उराडे यांनी परिश्रम घेतले.उपस्थिताचे वैधकिय चमुचे सांज मल्टी एक्टिविटी संस्थेचे संस्थापक तथा फालोआप कम्पचे आयोजक कुमार रूपलाल मारोती गोंगले यांनी आभार मानले.