ऍड एकनाथराव साळवे यांचे निधन 

 

राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि

बल्लारपूर : पुरोगामी चळवळीचे अग्रणी यौद्धा, फुले, शाहू आंबेडकरी विचारांचे निष्ठावान प्रचारक, सत्य शोधक समाजाचे प्रखर कार्यकर्ता, एनकाऊंटर, मी बौद्ध धम्म का स्विकारला, या शिवाय अनेक पुस्तकांचे लेखक, प्रसिद्ध विचारवंत, चंद्रपूर विधानसभेचे 11 वर्षे आमदार राहीलेले, ऍड एकनाथराव साळवे यांचे वृद्धापकाळाने 91 व्या वर्षी आज दुपारी 1.20 वाजता निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी 11 वाजता त्यांचे मुळ गांव बामणी (दुधोली) येथे करण्यात येणार आहे.