अहेरी तालुका प्रतिनिधी, इरफान शेख
योगायोग म्हणजे नर्सचे नांव फ्लारेन्स
“फ्लारेन्स” नाईटिंगेल ही जगातील पहिली नर्स होती
अहेरी:- कोरोना व्हॅक्सीनचा शुभारंभ झाल्यापासून असंख्यांना बिनधास्तपणे लस टोचली पण आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना लस टोचतांना थोडी भीती वाटली पण नंतर आनंदही झाला अशी प्रतिक्रिया अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका फ्लारेन्स हिने व्यक्त केले.
आमदार धर्मराव बाबा आत्राम हे मुंबई येथील अधिवेशन संपल्यानंतर आधी नागपूरला आले तर तिथून शुक्रवार 12 मार्च रोजी गडचिरोली मार्गे अहेरीत दाखल झाले. आधी राजवाड्यात म्हणजे निवासस्थानी न जाता थेट अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची प्रतिबंधक लस घेण्यासाठी पोहचले, लस घेण्यासाठी आधीच ऑनलॉइन नावाची नोंदणी (रजिस्ट्रेशन) केले होते.
कोरोनाची टीका दिल्यानंतर नर्सला सहज प्रतिक्रिया देण्यासाठी विचारले असता , प्रतिक्रिया द्यायला पण घाबरली , काय सांगू जरा भीती व धडधडी सुटली पण आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना लस दिल्याने आंनदही तितकाच झाल्याची सूचक प्रतिक्रिया दिली.
जगातील पहिली नर्स फ्लारेन्स नाइटिंगेल असून अगदी त्याच नावाची अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील “फ्लारेन्स” नावाची नर्स आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना कोरोनाची लस दिली हे विशेष व योगायोग!
लस घेतल्यानंतर स्वतः आमदार धर्मराव बाबा आत्राम अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणी खाली हॉस्पिटलाच थांबले. त्या नंतर प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस अर्थात व्हॅक्सीन घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, लस आली व लस निघाली मला काही होत नाही या आविर्भावात न राहता शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, नेहमी मास्क घालावे, वारंवार हात धूत राहावे, सॅनिटायझरचा वापर करावे, गर्दी टाळावे आणि अत्यंत महत्वाचे कामे असल्यास घराच्या बाहेर पडावे अन्यथा शक्यतोवर घरीच सुरक्षित राहावे असा संदेश देऊन प्रत्येकांनी कोरोनाची प्रतिबंधक लस घ्यावे असे आवाहनही यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबलू भैय्या हकीम, रा.काँ. चे महिला जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम, सुरेंद्र अलोने, नितीन दोंतुलवार, सत्यन्ना मिरगा, महेश येरावार आदी उपस्थित होते.