राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि
बल्लारपुर: शहरातील झाकीर हुसैन वार्डात स्थित श्री.गजानन महाराज सार्वजनिक वाचनालयाला नगराध्यक्ष मा.हरीशजी शर्मा यांच्या तर्फे पुस्तके (साहितीक,शैक्षनिक,ग्रंथ,धार्मिक,स्पर्धा परिक्षा इत्यादी) भेट स्वरुपात देण्यात आली.हे पुस्तके वाचनालयाचे संचालक श्री.घनष्याम बापुरावजी बुरडकर यांना सुपुर्त करण्यात आले.यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष काशी नाथ सिंह,महामंत्री मनिषजी पांडे,भाजयुमो शहर अध्यक्ष रणन्जय सिंह तसेच श्री.बापुरावजी बुरडकर,प्रमोद झिरकुंटावार,रमेश पिंपळकर,बबलु बहुरीया,रामचंद्र झोडे,राजुरकर,शेख बब्बु,शेर मोहमद,रामटेके इत्यादी नागरिक उपस्थित होते.