“आप” चे जिल्हा संयोजक सावसाकडे यांची शिक्षण अधिकारी मा. आर.पी. निकम यांच्या मार्फत कुचकामी ठरलेल्या शाळा फी आदेशाची होळी व नवीन तातडीच्या अध्यादेशाची मा. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी

 

जिल्हा प्रतिनिधी// शुभम खरवडे

गडचिरोली :महाराष्ट्रात महामारी काळात भरडलेल्या व न्याय पद्धतीने वाजवी फी आकारणीची मागणी करणाऱ्या पालकांना दिलासा देण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी तातडीने पाऊले उचलण्याची गरज होती. त्या साठी ८ मी २०२१ रोजी आपण काढलेला आदेश अत्यंत ढिसाळ असल्याचे निवेदन आम आदमी पार्टीने जुलै २० मध्ये दिले होते. परंतु ‘आमचा आदेश पालकांना न्याय देईल व फी कमी होईल’, ‘ हा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने आमचे हात बांधले आहेत’ अशी आश्वासने आपण वेळोवेळी विविध माध्यमातून दिली . आपण लेखी प्रसिद्धी पत्रक काढून पालक संघटना दिशाभूल करीत आहे असे म्हंटले. पण प्रत्यक्षात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला असून शैक्षणिक वर्षात सुरवातीलाच शाळांची फी ठरवली जात असल्याने हा आदेश प्रत्यक्षात कुठल्याच शाळेला लागू होणार नाही असे सरकारी वकिलांच्या दाव्या तून समोर आले आहे. प्रत्यक्षात फी सवलत मागितली जात असताना सदरच्या निर्णयानंतर कोणतीही फी कमी होणार नाही स्पष्ट झाले आहे. या सर्वात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा व पालकांच्या मागणीचा काहीच संदर्भ नाही हे उघड झाले आहे. हा आदेश पालकांच्या समस्यांचे निराकरण करत नाही उलट सदरचा आदेश अवाजवी फी आकारणाऱ्या शाळांच्या सोयीचा आहे.

 

या वर्षीची अकल्पित स्थिती पाहता बहुतेक सर्व शाळेची फी रक्कम किमान ५०% कमी होऊ शकते. त्यामुळे सेवा कमतरता – त्रुटीबाबत प्रत्यक्ष शाळेतील खर्चाशी शुल्काची सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे.

 

अजूनही कोविड-19 महामारी , लॉक डाऊन मुळे राज्यातील उद्योग, व्यापार यांना मोठा फटका बसला असून , सर्वच नागरिक आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात आले असताना पाल्यांच्या शाळा बंद आहेत. परंतु शाळा फी भरण्यासाठी सर्वांवर सक्ती होत आहे. पालक हतबल होऊन आपल्या पाल्यांना शाळा सुरु झाल्यावर शिक्षक त्रास देतील या भीतीमुळे हतबल झाल्याने आवाज उठवू शकत नाहीत. परंतु या काळात या लाखो पालकांना तातडीचा दिलासा देणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सरकारने कोरोना काळात खाजगी शाळांना फी वाढू दिलीच नाही उलट त्यांना शैक्षणिक फी मध्ये सूट देणे भाग पाडले. या धर्तीवर महाराष्ट्रात शासनाने पाऊले उचलत लॉकडाऊन काळातील शाळा फी नियंत्रणासाठी तातडीचा अध्यादेश काढण्याची मागणी आम आदमी पार्टी व सलग्न पालक संघटना करीत आहोत.

 

जिल्हा संयोजक मा. श्री. बाळकृष्ण सावसाकडे. मा. श्री. संजय जिवतोडे कोषाध्यक्ष.

मा. श्री. सुरेश गेडाम सदस्य मा. श्री. रुपेश सावसाकडे सदस्य. मा. श्री. देवेंद्रजी मुनघाटे. मा. श्री. अनिल बाळेकरमकर युवा प्रमुख मा. श्री. दिनेश आकरे. आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते