खमनचेरू ग्राम पंचायत येते विकास कामांचे भूमिपूजन 

 

अहेरी प्रतिनिधी इरफान शेख ..   

जिल्हा परिषदेच्या सदस्या मा.कु.सुनीता ताई कुसनाके यांच्या हस्ते भूमिपूजन

▪️मा.श्री.सायलू मडावी ग्रा. प.सरपंच खमनचेरू तसेच मा.श्री.रमेश पेंदाम माजी सरपंच यांच्या प्रमुख उपस्थिति

अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय खमनचेरू येते *15 वा वित्त आयोग अंतर्गत ग्राम पंचायत खमनचेरू येते प्रत्येक घरापर्यंत घरगुती नळ जोळणी चे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या सदस्या मा.कु.सुनीताताई कुसनाके यांच्या हस्ते करण्यात आले.

उन्हाळ्यात गावातील पाण्याची पातळी कमी असल्यामुळे सार्वजनिक विहिरीला व हातपंपाला पाणी राहत नाही कडाक्याच्या उना मध्ये पाण्यासाठी भटकावे लागते ही समस्या आवश्यक असल्याने जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे गावातील नागरिकांनी मागणी केली असता सदर 15 व वित्त आयोग घरगुती नळ जोळणी मंजूर करण्यात आली असून आज भूमिपूजन कार्यक्रम सम्पन्न झाला. असून नागरिकांना सोईचे होईल.

सदर भूमिपूजनाच्या वेळी खमनचेरू ग्राम पंचायतींचे सरपंच सायलू मडावी, माजी सरपंचरमेश पेंदाम,साईनाथ कुकुडकर उपसरपंच,नितीन कोडपे सदस्य, जीवकला आलम, शमा बारसागडे,कलावती कोडापे, साक्षी डोंगरे,संतोष देव्हारे, संतोष तालांडे,राकेश डोंगरे,चंदू कोरेत, दीपक कुसनाके,सुरज अडगुला पाणी पुरवठा अभियंता JE अमोल रामटेके,ग्रामसेविका संदया गेडाम आदि उपस्थित होते.