आमदार अभिजीत वंजारी यांची गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यापर्यंत समृद्धि द्रुतगति महामार्ग जोड़ण्याकरीता विधानमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात विधान परिषद मध्ये पुरवणी मागणी.

 

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // शुभम खरवडे

विदर्भातील सर्व जिल्ह्यांना मुंबईपर्यंत जोडण्या करिता दळणवळणाची साधने, कमी इंधन खर्च करून वेगवान करण्यासाठी हा प्रकल्प आहे, जेव्हा या प्रकल्पाच्या DPR तयार करण्यात आला तेव्हा विदर्भाचा विकास आणखी चांगला कसा होईल या उद्देशाने त्या ठिकाणी त्या डीपीआर मध्ये प्रोविजन करण्यात आली परंतु या सभागृहाच्या माध्यमातून हा द्रुतगती मार्ग आहे, समृद्धी मार्ग आहे. हा समृद्धी महामार्ग विदर्भातील उरलेल्या जिल्ह्यांमध्ये जोडण्यात यावा त्या ठिकाणी आंध्र प्रदेशाला लागून तसेच मध्य प्रदेशाला लागत आणि छत्तीसगडला लागत असलेला गडचिरोली आणि गोंदिया जिल्हा आहे. त्या जिल्ह्यापर्यंत आपल्या विकासाची गंगा पोहोचली पाहिजे या उद्देशाने समृद्धी महामार्ग गोंदिया गडचिरोली पर्यंत घेऊन गेला तर निश्चित पर्यंत या उरलेल्या नक्षलग्रस्त भागांमध्ये आदिवासी भागांमध्ये त्या ठिकाणी विकास करण्यासाठी अत्यंत चांगला मार्ग सुसह्य होईल अशी मागणी आमदार श्री.अभिजीत वंजारी यांनी केलि आहे.

तसेच विदर्भाच्या आरोग्य , सिंचन, प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना , पदभरती व पदवीधर संघटना व महिला बचत गट यांना शासकीय अनुदानाच्या योजना राबविण्यासाठी कंत्राट देण्याचीं मागणी करण्यात आलि.