नगर पालिका अध्यक्ष श्री. हरिष शर्मा यांची आकस्मिक भेट

 

 राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि

बल्लारपूर : दि. 05 मार्च रोजी बल्लारपुर शहरातील शिवनगर वार्डातील रहीवासी मिणा शंकर जैयस्वाल यांचे विटा मातीचे घर अचानक कोसळल्याची बातमी कळताच नगराध्यक्ष मा. हरीश शर्मा यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली व तात्काळ त्या परिवाराला आर्थिक मदत करुन त्यांनाधीर दिला.यावेळी न.प. उपाध्यक्ष सौ. मिनाताई चौधरी, भाजपा चे शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह भाजपा श्री.गणेश चौधरी, श्री. नफीस अन्सारीजी उपस्थित होते.