मेरा बूथ सबसे मजबूत” या संकल्पनेचा कार्यकर्त्यांनी स्वीकार करावा-डॉ.मंगेश गुलवाडे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरातील सिव्हील(पश्चिम) मंडळाच्या बूथ प्रभारींची बैठक संपन्न

 

 ( प्रफुल चावरे: जिल्हा प्रतिनिधि)

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने विविध मंडळात बूथ रचना मजबुत करण्याचे कार्य सुरू आहे त्यातीलच सिव्हील (पश्चिम)मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होतीत्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे बोलत होते त्यांनी मेरा बूथ सबसे मजबूत या संकल्पनेचा कार्यकर्त्यांनी स्वीकार करून पक्ष संघटन मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी सांगिलेत्यानंतर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर बूथ संयोजक तथा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी कार्यकर्त्यांनी नियोजनात्मक रित्या बूथ रचनाकरून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या यावेळी सदर बैठकीत मंडळ अध्यक्ष रवीलोणकर, भाजयुमो महामंत्री प्रमोद क्षिरसागर,भाजपा सचिव राकेश बोम्मनवार, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे,महामंत्री किशोर आत्राम,शत्तिकेंद्र प्रमुख संजय चिलक,महेंद्र शिवणकर, जगदीश वलके,विक्की पेंदाम,गणेश कूळसंगे,रणजित येरकाडे,अरविंद मडावीशाहरुख शेख,राजेश नागपुरे,शरद कांबळे, रवी बोकडे, ,जगदीश मिश्रा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.