बंडू धोत्रे यांना अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याबाबत प्रशासनाचे विनतीपत्र
प्रफुल चावरे जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर : शहरातील रामाला तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना त्यांचा अन्याग सत्याग्रहमागे घेण्याबाबत प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे विनंती आज दिनांक 4/03/2021 रोजी महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते व तहसिलदार निलेश गोंड यांचे हस्ते देण्यात आले
सदर पत्रात पर्यटन, पर्यावरणव राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यानी चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गाँडकालीन रमाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याकरीता रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदयाकरण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास येत्या सात दिवसात सादर करण्याबाबत तसेच रमाळा तल स्वच्छता व सुशोभीकरण करण्याकरीता दोन टप्याल कामे पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री ठाकरे याच्या निर्देशम्बयें जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपरोक्त विषयाबाबत सर्व संबंधित यंत्रणेची आढावा सभा घेण्यात आली असून रामाळा तलाव खोलीकरण बाबतचा प्रस्ताव पाटबंधारे विभागामार्फत तयार करण्यात आला असल्याचे व तो लवकरच पर्यटन विभागाससादर करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
खोलीकरणाबाबत पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याने विहीत नमुन्यात परवानगीसाठी प्रस्ताव तयार करून भारतीय पुरातत्व विभागाला सादर करण्यात येत असल्याबाबत व यासंबंधाने वरित कार्यालयाशी चर्चा करून सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करन्यास विनंती करण्यात आली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे