सिद्धबली इस्पात लिमी च्या पूर्वीच्या कामगारांचे थकीत येत्या एक महिन्यात अदा करावे – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे सहायक कामगार आयुक्त व कामगारांच्याबैठकीत स्पष्ट सूचना

 

 

 (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

बल्लारपूर : उदयोगातील पूर्वीच्या कामगारांचे सर्व बकाया/ आर्थिक मोबदला देऊनच नवीन व्यवस्थापनाने आपले उद्योग उत्पादन सुरु करावे तसेच या अनुभवी कामगार कर्मचा-्यांना रोजगारांत प्राथमिकता द्यावी असे असतांनाही ताडाळी एमआयडीसी येथील सिद्धबली इस्पात लिमी उद्योग संचालक व्यवस्थापनाने या कामगार / कर्मचान्याचे हक्क हिसकावले आहे याचा निषेध करीत या सर्व कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे हि आग्रही भूमिका असून कामगारांचे येत्या एक महिन्यात सर्व आर्थिक बकाया आजपर्यंतच्या व्याजासह अदा करावे अशा सूचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सहायक कामगार आयुक्त नि. पा. पाटणकर यांना बैठकीच्यामाध्यमातून दिले.

 

या बैठकीला भाजप महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विजय राऊत, खुशाल बोंडे, जिल्हा परिषद् सदस्य रणजीत सोयम, डॉ. शरद रणदिवे, सोनेगांव सरपंच संजय संजय उकीनकर येरुर चे सरपंच मनोज आमटे, ताडाळीचे उपसरपंच निखिलेश चांभारे, पडोली चे ग्राम पंचायत सदस्य विक्की लाइसे, विकास खटी, किनोद खेवले, तसेच सिद्धबली इस्पात च्या पूर्वीच्या कामगारांची उपस्थिती होती.

 

सिद्धबली इस्पात लिमी ने पूर्वीच्या स्थानिक कामगारांवरती थेट अन्याय केला असून हा अन्याय कुठल्याही परिस्थितीत

 

सहन केल्या जाणार नसल्याची प्रखर भूमिका यावेळी हंसराज अहीर यांनी मांडली नियमानुसार सिद्धबली उद्योग

 

संचालनकांनी या कामगारांना आर्थिक मोबदला दिला पाहिजे तसेच त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देणे अपेक्षित

 

असतांनात्यांचे हे वर्तन निषेधार्ह आहे असेही यावेळी अहीर यांनी सांगितले. या सर्व कमगारांची सविस्तर यादी सहायक

 

कामगार आयुक्त यांच्या कार्यालयास सादर करून या सर्व कामगारांना संपूर्ण आर्थिक मोबदला मिळेलव रोजगारात प्राधान्य

 

मिळेपर्यंत आपण हा मुद्दा रेटून धरणार असून सिद्धबली उद्योगाचा मनमानी कारभार बंद करणार असल्याचा इशाराही

 

यावेळी अहीर यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात दि. ३०/७/२०१९ रोजी जिल्हाधिकारी महोदयांसमोर या सर्व कामगारांचे थकीत अदा करण्याच्या सूचना देण्यात सिद्धबली इस्पात च्या संचालकांना देण्यात आल्या होत्या, त्या सूचनांचे संचालकांनी पालन न केल्यामुळे सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून दि. १८/११/२०१९ रोजी पत्राच्या तसेच शाब्दिक सूचना दिल्यानंतरही संचालकांनी कुठलीही कार्यवाही घेतली नसल्याची गंभीर माहिती यावेळी सहायक कामगार आयुक्त यांनी अहीर यांना दिली. जिल्हाधिकारी महोदयांच्या व सहायक कामगार आयुक्त यांच्या आदेशाचे अवहेलना करणाऱ्या सिद्धबली उद्योगावर नियमाला अनुसरून कडक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी अहीर यांनी सहायक कामगार आयुक्त यांना दिले.