लॉकडाऊन दरम्यानचे २०० यूनिटपर्यंतचे वीज बिल माफ करा: आम आदमी पार्टी ची निवेदनातुन मा. कृष्णाजी गजबे यांच्या कडे मागणी.

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // शुभम खरवडे

 गडचिरोली: राज्यातील नागरिकांची कोविड दरम्यानच्या *चार महिन्याचे २०० युनिट पर्यंत वीजबिल माफी*, वाढीव वीज दर मागे घेणे व *शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे ३०%* दर कमी करने आणि

*काँग्रेस – राष्ट्रवादीच्या शपथनाम्या प्रमाणे औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक* ठेवण्यासाठी या अधिवेशनात निर्णय घेण्यात यावे,

आपणास माहितच आहे की कोविड-१९ महामारी दरम्यान राज्यातील जनतेची परिस्थिती फारच बिकट होती आणि आजपर्यंत जनता यामधून बाहेर पडलेली नाही. असे असतांना सरकारने बिल न भरू शकलेल्या जनतेची वीज मिटर कापण्यास सुरवात केली होती, त्यावर विधानसभेत ‘ *चर्चा होईपर्यंत वीज तोडणी थांबवण्यात येत असल्याचे* विधान मा. उप मुख्यमंत्री यांनी काल केले आहे . 

वरील प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आपण आता याच विधानसभा अधिवेशनात जनतेच हित आणि महामारीची परिस्थिती नजरेसमोर ठेवून खालील निर्णय घ्यावेत ही जनतेची आणि आम आदमी पार्टीची नम्र विनंती आहे.

१. कोविड दरम्यानचे मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीज बिल माफी करावी,

२. MSEB कडून दि १ एप्रिल २०२० पासून करण्यात आलेली वीज दर वाढ मागे घ्यावी,

३. शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे ३०० युनिट पर्यंत ३०%  स्वस्त वीज देण्याचे वचन पूर्ती करावी,

४. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शपथनाम्यात औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवणार असल्याचे म्हंटले होते, त्याची पूर्तता करावी.

५. राज्य सरकार चा १६ % अधिभार आणि वहन कर रद्द करण्यात यावा,

६. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे,