कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.. मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांची मागणी, राजू यादव कुटुंबीयांची उपस्थिती

 

( प्रफुल चावरे: जिल्हा प्रतिनिधि)

चंद्रपूर  जिल्ह्यात अवैध व्यवसायातून वाढलेली संघटित गुन्हेगारी ही चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसह सामाजिक आरोग्य बिघडवित असून राजुरा येथे दि. 3१ जानेवारी २०२१ रोजी कोळसा ट्रान्सपोर्टर व्यवसायी यांची भरवस्तीत चंदन शितलप्रताप सिंग व सत्येंद्रकुमार परमहंस सिंग या आरोपींनी बंदुकीने गोळ्या घालून केलेली हत्या यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, राजू यादव हत्याकांड कटात सहभागी हत्या पवनी वेकोली माईन्स येथील कोळसा वाहतुकीच्या वादावरून झाली असून पोलिसांनी केवळ चंदन शितलप्रताप सिंग व सत्येंद्रकुमार परमहंस सिंग ह्या दोघानाच अटक केली असून या हत्याकांड कटात १) झुल्लूर पाठक, २) अनिल झाँ, ३) मनिश शर्मा, ४) मनोज शर्मा, ५ ) गुड टायरवाला हे सुद्धा हत्येच्या कटात सहभागी असल्याची बाब राजु यादव यांच्या कुटुंबियांनी आपल्या पोलिस तक्रारीत नमुद केलेली आहे. परंतु पोलिसानी या आरोपीना अटक केली नाही यावरून है प्रकरण दडपल्या जात असल्याचा आरोप मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

वेकोली कोळसा वाहतुकीत आपली दादागिरी चालावी म्हणून संघटित गुन्हेगारी वेकोली क्षेत्रात वाढलेली आहे. व परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये बंदुका (माऊझर) आणून हत्या करण्याचे प्रकार वाढलेले आहे. यामध्ये बल्लारपूर येथे सुरज बहुरिया यांच्या झालेल्या खुनात वापरलेली बंदुक कुठून आणली याचा शोध पोलिसांनी घेतलेला नाही. शिवाय व राजू यादव यांचा झालेला खुन यामध्ये वापरण्यात आलेल्या बंदुका