चंद्रपूर जिल्हात श्री. राजु वानखेडे डीएसएम मधे प्रथम मेरीट

 

चंद्रपुर (प्रफुल्ल चावरे: जिल्हा प्रतिनिधी)

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत श्री. राजू किसनराव वानखेडे यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशीक तर्फे नूकत्याच घेण्यात आलेल्या मे / जुन 2020 च्या अक्टूबर 2020 मधील परिक्षेत शालेय व्यवस्थापन पदविका या अभ्यासक्रमात 97.88 टक्के गुण प्राप्त होवून चंद्रपुर जिल्हात प्रथम मेरीट आलेले आहेत.

 

या यशाचे श्रेय त्यांनी श्री. अशोकराव जिवतोडे, सचिव चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, श्री. एस. एम. सातपूते, मार्गदर्शक जनता

बी. एड. शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर तथा श्री. पी. एस बेंडले, मुख्याध्यापक, जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर याना

दिले आहे.