संपादक / अनिकेत खरवडे
आज दिनांक 1 मार्च 2021 सोमवारला माननीय किशोर जी पोद्दार साहेब जिल्हा संपर्कप्रमुख गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालासंदर्भात चामोशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह चामोशी येथे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये चामोर्शी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. चामोर्शी तालुक्यात एकूण 22 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले. व 19 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे उपसरपंच विराजमान झाले. तसेच एकूण शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य एकशे वीस च्या संख्येपेक्षा जास्त निवडून आले. तसेच येणाऱ्या नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये चामोर्शी नगरपंचायत तथा मुलचेरा नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा कसा फडकवता येईल. यासंदर्भात चर्चा करण्यात आली. व सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून नगरपंचायत आपल्या ताब्यात घ्यावी. या संदर्भात माननीय पोद्दार साहेबांनी मार्गदर्शन केले. या सभेला श्री विलास ठोंबरे ज्येष्ठ नेते शिवसेना, श्री धर्मराज राय उपजिल्हा प्रमुख शिवसेना, पप्पी पठाण तालुकाप्रमुख ग्रामीण, श्री अमित यासलवार तालुका प्रमुख शहर, बंडू नैताम शहर प्रमुख चामुर्शी मनोज पोरटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.