आलापल्ली विश्रामगृह येथे शिवसेनेची बैठक संपन्न

 

संपादक // अनिकेत खरवडे

आलापल्ली:  विश्राम गृह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख, मा. किशोर पोतदार साहेब यांच्या अध्यक्षते खाली तसेच गडचिरोली जिल्हा प्रमुख, राजगोपाल सुलवावार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्या साठी प्रत्येक गावागावात संघटन कार्य पोहचविण्यासाठी प्रत्येक समाजातील लोकांना न्याय मिळाले पाहिजे, शिवसेना पक्षचे धोरण आचार विचार कान्या कोपऱ्या पर्यंत पोहचले पाहिजे समाजाचा प्रत्येक अंग शिवसेने सोबत जुळले पाहिजे सर्वांना न्याय न्याय कसे मिळेल या आशेवर बैठक घेण्यात आली सविस्तर चर्चा करून शिवसेने सोबत अल्प संख्यांक वर्ग सोबत येण्यासाठी आवश्यक आहे याचा विचार करून पूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे अल्पसंख्यांक समाजातील लोकांना शिवसेना विचारधारा सोबत जोडण्यासाठी आणि पक्ष संघटन वाढविण्यासाठी दिनांक २८/०२/२०२१ रोजी जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांनी शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख पदी रियाजभाई शेख यांची निवड करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात अल्पसंख्याक सेना संघटन मजबूत करण्या ची जबाबदारी दिले. नियुक्ती पत्र देऊन रियाज भाई शेख यांना शुभेच्छा दिल्या या बैठकीत उप जिल्हा प्रमुख, धर्मराज राय, युवा सेना अधिकारीअहेरी विधानसभा , महेंद्र सुलवावार, शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक प्रमुख्याने उपस्थित होते