मजुराला बेदम मारहाण करणाऱ्या वन अधिकारी वन कर्मचाऱ्यांचे निलंबन कधी

 

गडचिरोल्ली जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर

Khabardarmaharashtr#onlinenewsportal#social#education#sports#crime

 

कोरची:- तालुक्यातून 10 की मी .अंतरावर धोलिकासा ते नाडेकाल या रत्याचे काम सुरू आहे या कामावर टेक्टर ने गिट्टी पहोचवण्या चे काम सुरू या कामावर गिट्टी पहोच्वून ड्रायव्हर राजेंद्र वरखेडे मजूर मायाराम ताडामी परत येत होते त्या वेळेस पुराडा वनपरिक्षेत्र चे वनपरिक्षेत्र अधिकारी दिघोरे सोबत असलेले वन रक्षक गावड आणि वनकर्मचारी यांनी ट्रकटर थांबविले आणि ड्रायव्हर ला उतरण्यास सांगितले आणि मयाराम ताडामी यालाही उतरविले आणि कोणतीही चौकशी न करता बेदम पणे बांबू आणि लाठया काठ्यानी मारण्यास सुरवत केली यात मयारांम तडामी हा गंभीर जखमी झाला

 

याला तत्काळ कोरची दवाखान्यात भरती केले मार जास्त असल्याने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भरती केले मारहाण करणारे वनरक्षक गावड सोबतची चमू यांनी भरपूर दारू प्याले होते आज 28 फेबुरवरी ल बेडगाव गाव येथील जखमी मजूर तडामी ड्रायव्हर वरखेड ची भेट घेतली व हकीकत जाणून घेतली .मजूरना व ड्रायव्हर ला वन अधिकाऱ्यांना मारण्याचा अधिकार कुणी दिला काही दिवसा पूर्वी अमर कन्स्ट्रकशन चे पुरडा मलेवडा रस्त्याचे काम सुरू आहे तिथे ही वन कर्मचाऱ्यांनी रस्त्यावार उभे असलेले जेसिपी अटक केली तेथील कर्मचाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करून जेल मधे पाठविले तसेच 3/4 महिन्या पूर्वी अंतरगाव परिसरात शेती जवळील काठ्या कुठ्या जेसीपी ने साफ सुफ करताना जेसिपि ला अटक केली नंतर देवाण घेवाण करून दुसऱ्या दिवशी कारवाही न करता सोडून दिले असा आतंक पूराडा वन परिक्षेत्र तील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केला या मुळे सर्व साधारण जनता विकासाचे काम करणाऱ्यावर खोटी कारवाही ची दहशत पसरली आहे तरी वन परिक्षेत्र अधिकारी दिघोरे वन रक्षक गावडे सोबत ची चमू तसेच वनरक्षक ढवळे यांना निलंबित करावे अशी मागनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल कोरची तालुका प्रमुख डॉ नरेश देशमुख लोकेंद्र शहा सयाम मुजहीन शेख गुरुदेव मेश्राम कामगार सेनेचे अनिल उईके यांनी केली आहे