गुंडेनूर नाल्यावर स्वतंत्र बंधारा बांधण्यात यावा यासाठी माजी आ नामदेव उसेंडी यांना निवेदन

 

 

भामरागड ;-भामरागड तालुक्यातील गुंडेनुर नाल्यावर पुलीयासोबत बंधारा किंवा स्वतंत्र बंधारा बांधण्यात यावा. या करिता गुंडेनुर भागातील नागरिकांची मागणी व पाठपुरावा करून मागणी पूर्ण करण्यासाठी माजी आमदार नामदेव उसेंडी यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे अध्यक्ष खुशाल मडावी, युवासेनेचे अध्यक्ष दिनेश मडावी, नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजु वडडे, विजय कुडयामी, माजी सरपंच गजानन सडमेक, नगरसेवक गजानन उईके, वामनराव उईके, धोडराजचे माजी सरपंच झुरू कुडयामी, काँग्रेस नेते उमेश वेलादी आदींनी मागणी केली आहे.