भामरागड भागातील पुरातन शिल्पकला जागतीक स्तरावर

देवराई आर्ट व्हिलेज येथे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी शिल्पकला विषयी कला जाणून घेतली.

गडचिरोली जिल्हयातील भामरागड हा तालुका नेहमी मागासलेला तालुका म्हणुन त्याची हिनवणी होते. परंतु देवराई शिल्पकलेच्या माध्यमातुन या परिसरात सुध्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणारी पुरातन शिल्पकला आजही अस्तीत्वात आहे. याच धाग्याला पकडून कोयमगुडा येथील सुरेश पुघांटी यांनी दृढ निश्चिय करुन पुरातन आदिम काळातील शिल्पकलेला जागतीक दर्जावर नेण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी महाबळेश्वर येथील पाचगणी येथे जावून आधुनिक तांत्रिक शिक्षण घेवून पुरातन व आधुनिक कलेचा मेळ घालून धातु व दगडावर कोरीव शिल्पकला करण्याचा केंद्र सुरु केला. त्या ठिकाणी जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्याना प्रशिक्षण सुरु होता. परंतु कोवीड काळामध्ये हे प्रशिक्षण केंद्र चालविणे शक्य न झाल्याने ज्या शिल्पकलेचा उगम भामरागड तालुक्यात झाला त्याच ठिकाणी जावून तेथील मुलांच्या कौशल्याला योग्य प्रशिक्षण देवून त्यासाठी रोजगार मिळवून देण्याचा निश्चियाने एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड यांच्या सहकार्याने भामरागड येथेच देवराई संस्थेच्या माध्यमातुन परिसरातील 40 ते 50 मुला मुलींना शिल्पकलेचे प्रशिक्षण देणे सुरु आहे. त्यात निर्माण होण्या-या वैविध्य पुर्ण शिल्पांना बाजारपेठे मध्ये मोठी मागणी आहे. त्यांना त्यांचा ईमेल व्दारेे मागणी होते. त्यानुसार तिथे शिल्पकला निर्मीती केली जाते. या भामरागड भागातील सर्वोत्कृष्ठ शिल्पकलेच्या केंद्राला आदिवासी काॅग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. नामदेवराव उसेंडी यांनी भेट दिली व बनविण्याच्या कला जाणून घेतली व कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी राजू वड्डे, खुशाल मडावी, दिनेश मडावी, गजानन उईके, उमेश वेलादी, विजय कुडयामी, वामनराव उईके, जुरु कुडयामी, दत्तात्रय करंगामी उपस्थित होते.