पंचायत समिती, एटापल्ली वार्षिक आमसभेचे आयोजन

गडचिरोल्ली जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर

गडचिरोली,दि.15: पंचायत समिती, एटापल्ली सन 2022-23 ची वार्षिक आमसभा धर्मरावबाबा आत्राम, आमदार, अहेरी 69 निर्वाचन क्षेत्र तथा माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोज शुक्रवारला 11.00 वाजता पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित केली आहे. तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व समाजमाध्यम प्रतिनिधी, पंचायत समिती अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी तथा नागरीक, तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी यांनी उपस्थित राहुन वार्षिक आमसभेत सहभाग घेण्याचे आपणास आवाहन करण्यात येत आहे. असे सदस्य सचिव तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती, एटापल्ली यांनी कळविले आहे.