खबरदार महाराष्ट्र ऑनलाईन न्युज नेटवर्क
आरमोरी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका ,आरमोरी तर्फे पक्ष वाढीच्या कार्यासाठी दि. ५ फेब्रुवारी २०२३ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गडचिरोली सारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील महिलांचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सामाजिक,
https://khabardarmaharashtra.com/02/2023/news/18216
राजनीतिक शैक्षणिक कृषी औद्योगिक अशा विविध विषयावरील विचारांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षा विभाताई बोबाटे यांनी मार्गदर्शन केले या मार्गदर्शनातून प्रेरित होऊन आरमोरी शहरातील महिलांनी मनसे आरमोरी तालुकाध्यक्षा विभाताई बोबाटे, मनसे तालुका उपाध्यक्षा मा. ज्योतीताई बगमारे, यांच्या नेतृत्वात आरमोरी शहरातील सामाजिक महिला लताताई लोणारे, वंदनाताई शेंडे, यांनी आपल्या महिला संघटनासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केले.
https://khabardarmaharashtra.com/02/2023/news/18213
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला आघाडी तालुका-अध्यक्षा विभाताई बोबाटे यांच्या हात खाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तालुका उपाध्यक्षा ज्योतीताई बगमारे, महानंदा शेंडे, उमा कोडापे, आशा बोडणे व इतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.