तळेगांव च्या सत्याग्रही घाटात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

 

 

 

तळेगांव शा पंत – तळेगांव च्या सत्याग्रही घाटात एका इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे, आज दुपारच्या सुमारास ही बाब उघडकीस आली.तळेगांव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचारी ज्योती लंगडे वनरक्षक ह्या जंगलात गस्तीवर असतांना त्यांना हा मृतदेह आढळून आला. बसणागोंडा सांतागोंडा पाटील ,राहणार चांमनल्ली पो बंडाली, जी यादगीर राज्य कर्नाटक असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले, तळेगांव मधील सत्याग्रही घाटाच्या अगदी पायथ्याशी दाट जंगलात हा मृतदेह पडून होता ,घटनास्थळी मृतदेहाजवळ दारूची बॉटल, विषाची शिशी, गुटख्याच्या पुड्या बॅग ,त्यामध्ये इस्त्री केलेले कपडे व्यवस्थित ठेऊन होते. साफ चादरीवर बसून सुरुवातीला दारू पिउन त्यामध्येच विष प्राशन केले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. जंगलाच्या आत खोल दरीत मृतदेह आढळल्याने पोलिसांना तो मृतदेह नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. घटनास्थळी पोलीस ठाणेदार आशिष गजभिये, पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार राजेश साहू,अनिल ढाकणे, सुरज राठोड, मनोज आसोले,आशिष नेवारे, कृनाल कांबळे असा मोठा पोलिसांचा फोउजफाटा उपस्थित होता.