संत गाडगे महाराज जयंती निमित्त एनसीसी छात्र सैनिकांनी राबविले स्वच्छता अभियान

 

स्थानिक गांधी विद्यालय येथील एनसीसी छात्र सैनिकांनी आज दिनांक 23 फेब्रुवारी संत गाडगे महाराजांची जयंती निमित्त *शालेय परिसर आणि बगीच्या मधील कचरा स्वच्छ करून* साजरी केली विद्यार्थ्यांनी यावेळी स्वच्छतेची शपथ सुद्धा घेतली यामध्ये प्रत्येक रविवारी होणाऱ्या सायकलिंग या ॲक्टिव्हीटी अंतर्गत वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन सुद्धा हे अभियान राबवण्यात येणार आहे. संत गाडगे महाराजांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे जेणेकरून स्वच्छतेचे सुरुवात स्वतःपासून जर केली तर देश आपोआपच स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करेल असे विद्यार्थ्यांना एन सी सी अधिकारी प्रमोद नागरे यांनी मार्गदर्शन केले.