आर्वी-नगर परिषद माध्य. व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी,नागपूर येथे दि.२२/१/२०२२ रोजी *A NATIONAL LEVEL SCIENCE FAIR & RESEARCH COMPITITION* मध्ये एकूण इतर शाळेतील 500 च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.यामध्ये नगर परिषद शाळेतील मल्टी-स्किल या व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील
विद्यार्थी नवीन नवीन उपक्रमात भाग घेत असतात.त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मल्टी-स्किल मध्ये बनविलेला *TRANSMISSION AND DISTRIBUTION SYSTEM MODEL* Project स्पर्धा उपक्रमात भाग घेत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. यामध्ये कु.प्रणाली मनवरे,कु.श्रुती मुरतकर,कु.उत्कर्षा भगत या वर्ग १०वीच्या विद्यार्थिनी सहभागी होत्या.सर्व विजयी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका नागपुरे मॅडम तसेच सर्व शिक्षक कर्मचारी वर्गाने कौतुक केले.सर्व स्तरावरून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या पारितोषिकाचे श्रेय हे आपल्या आईवडिलांना सोबतच मल्टी-स्किल विषय शिक्षक हेमराज चौधरी यांना देत आहे.