भरघाव ट्रॅव्हलची लग्नातील कार व घोड्याला धडक

 

बातमी संकलन //उमंग शुक्ला

तळेगाव (शा.पंत) :- आज सकाळी अकरा वाजता चे दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव नजीक उदयराज मंगल कार्यालयाजवळ सुरत वरून नागपूरला भरधाव जाणाऱ्या ट्रव्हल्स ने कार व लग्नातील घोड्याला धडक दिल्याने अपघात घडला.यामध्ये कारचे एक ते दिड लाखाचे नुकसान झाले तर घोडाचे मागील दोन्हि पाय व कंबरेला इजा होवुन चार लाख रुपये किंमतीचा घोडा गंभिर जखमी झाला. यामध्ये सुदैवाने कोणतीहि जिवितहाणी झाली नसुन मोठा अनर्थ टळला.

सविस्तर वृत्त असे की सुरत वरून. नागपूरला प्रवासी भरून जात असलेली ट्रव्हल क्र.जी.जे.14 झेड 2000 क्रमांकाचे ट्रव्हल्सने कार मालक प्रकाश शेटे रा. यवतमाळ यांच्या कार क्र.एम. एच. 29 बी.व्ही.0383 ला व नवरदेव काढण्याकरिता आलेला घोडा यांना जोरदार धडक दिली या धडकेमध्ये कारचे मोठे नुकसान झाले.तर घोडा मालक दिनेश सुखदेवराव दहिवाडे रा. आर्वी यांच्या चार लाख रुपये किंमतीचा घोडा गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती तळेगाव पोलीस स्टेशनला मिळताच तळेगाव पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेवुन घटनेची नोंद घेवुन घटनास्थळाचा पंचनामा करुन ट्रव्हल्स चालक श्रीकांत आघाडे रा. नांदगाव खंडेश्वर यांचेवर गुन्हा दाखल केला.अधिकचा तपास तळेगाव पोलीस करीत आहे.

एस.टी च्या संपामुळे ट्रव्हल्स ची वाढली प्रवासी वाहतुक

गेल्या तिन महिण्यापासुन एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे लालापरी आगारात उभी आहे.याचा फायदा घेत ट्रव्हल्स धारक प्रत्येक गावावरून प्रवासी मिळण्याकरिता राष्ट्रिय महामार्गावरील गावातील सर्व्हिस रोड ने ट्रव्हल ने आन करीत असून.बरेचरा रोडच्या मध्यभागी ट्रव्हल उभी करुन वाहतुकीस अरथळा निर्माण करतात.त्यामुळेहि अनेकदा किरकोळ अपघात घडत असतात.