नितीन आष्टीकर यांच्या मागणीला यश पोलीस क्वाटर्सच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी 69,94,283 निधी मंजूर

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

 

 

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे माजी तालूका अध्यक्ष नितिन आष्टीकर यांच्या मागीला मिळाले यश. मॉडेल शाळे लगतचा पोलीस क्वॉर्टरच्या प्रलंबीत समस्या निकाली काढण्या करिता झाला ६९,९४,२८३ रु. एवढा निधी मंजूर. दि. १६/०७/२०२१ ला आर्वी शहरातील मॉडेल शाळे लगतच्या पोलीस क्वॉर्टर मध्ये विविध समस्या बाबत मा. नाम.श्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन त्यांचे खालील विविध समस्या शासनाच्या निदर्शनास आणून त्याची पूर्तता करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली होती. तसेच दि. २०/९/२०२१ ला त्याच मागणीच्या संदर्भात स्थानिक प्रशासन (नगर पालीका) यांना सुध्दा अवगत करण्यांत आले होते. दोन्ही निवेदनातून खालील समस्याच्या संदर्भात आवर्जून लक्ष घालून समस्या निकाली काढण्याच्या संदर्भात मागणी केली होती.

१) निवासस्थाने पूर्णपणे सुरक्षित नाही.
२) निवासस्थारने समोर नाली नाही
३) निवासस्थाने समोर रोडवर रेती टाकलेली आहे
४) निवासस्थाने समोर डांबरी रस्ता नाही
५) निवासस्थाने समोर घाणीचे साम्राज्य आहे
६) निवासस्थाने समोर बेसरम व इतर खुप झाडे आहे
७) निवासस्थाने समोरील परिसरात अस्वच्छ गंदगी पसरलेली आहे
८) निवासस्थाने समोरील मेन गेट तुटलेला आहे यामुळे परिवाराची सुरक्षा धोक्यात आहे
९) परिसरात तारेचे कंपाऊंडवॉल सुध्दा नाही
१०) निवासस्थानांना रंगराई सुध्दा व्यवस्थीत नाही
११) निवासस्थाना समोर रात्री लाईटची व्यवस्था नाही.

त्यानिमित्ताने शासकीय पातळीवर या मागण्याच्या संदर्भात दखल घेऊन मागणीची पूर्तता करण्या संदर्भात प्रशासकीय पातळीवर सुरुवातझाली. त्याबद्दल नागरीकांमध्ये धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने सुध्दा या मागणीच्या संदर्भात काम सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यांत येत आहे.