येथील नगरपंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अनिल धोत्रे तर उपाध्यक्षपदी शेख जाकीर हुसेन अब्दुल हुसेन यांची बिनविरोध निवड झाली तर गटनेता म्हणून राहुल लाड यांची निवड आहे याबाबत असे की, आष्टी नगरपंचायत मध्ये मागील काही दिवसात राजकीय उलथापालथ होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि स्थानिक जनशक्ती संघटना यांच्यामध्ये अभूतपूर्व अशी युती होऊन काँग्रेस पक्षाचे ८ नगरसेवक, जनशक्ती संघटनेचे ५ आणि १ अपक्ष आणि १ बहुजन समाज पक्षाचा नगरसेवक अश्या एकूण १५ नगरसेवकांनी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या बाजूने मतदान केले अध्यक्षपदाच्या अर्जासाठी सूचक म्हणून नगरसेवक राहुल लाड तर अनुमोदक सीमा सत्पाळ आहेत उपाध्यक्षाच्या पदासाठी सूचक नगरसेवक रामकृष्ण सुरजुसे तर अनुमोदक नगरसेविका माधुरी सोनटक्के समर्थन दिले विरोधी पक्षातील भाजपाचे २ नगरसेवक सभागृहात अनुपस्थित होते सदर विशेष सभा निवडणूक अध्यासी अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी रवींद्र जोगी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता सुरू करण्यात आली यात चित्रा पोहणे,रामकृष्ण सुरजुसे, हुसेन शेख रेहान अख्तर,राहुल लाड,रत्नमाला सुरपाम,खा. गौंजखा याकूब,अहमद यास्मिन अंजुम सिराज,खान नुसरत परवीन मुखत्यार, शेख जाकीर हुसेन अब्दुल हफिज, योगेंद्र पोकळे, सिमा निंबेकर, सिमा सत्पाळ, माधुरी सोनटक्के, अर्चना विघ्ने अनिल धोत्रे इत्यादी नगरसेवक,नगरसेविका यांच्या उपस्थित विशेष सभा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर काँग्रेसचे माजी आ.अमर काळे, स्थानिक जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा मकेश देशमुख यांच्या नेतृत्वात आष्टी शहरात विजयी रॅली काढण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व आनंद पाहायला मिळाला