शालिग्राम धर्मशाळेच्या कार्यक्रमाचे पैसे मागितल्या कारणावरून चाकुने केला वार

 

जिल्हा प्ररीनिधी //उमंग शुक्ला

आर्वी : येथे शालिग्राम धर्मशाळेत कार्यक्रमाचे पैसे मागितल्यावरून मारहाण केल्याचे दि. 15-02-2022 रोजी आर्वी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल
शालिग्राम धर्मशाळेत दीपक चुडीवाल हे सचिव म्हणून कार्यरत असून 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सोनु बरारा यांचा चुलत भाऊ गुलशन बरारा यांने धर्मशाळा बुक केली होती. उर्वरित सात हजाराची रक्कम कार्यक्रम संपल्यानंतर देतो असे सांगितले होते. ते स्वागत समारोहात रात्री उशिरापर्यंत लग्नातील वाद्य वाजत असल्याने दीपकने हटकवल्याने गुलशन बरारा यांनी शिवीगाळ केली. कार्यक्रम संपल्यावर दीपक हा उर्वरित पैसे मागण्यास गेला असता गुलशन विजय बरारा व त्याच्या चुलतभाऊ सोनु उर्फ कोमल गिरधर बरारा यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत चाकूने वार केला. यात दीपक जखमी झाला असून आर्वी पोलिसात तक्रार दिली पुढील तपास आर्वी पोलिस करीत आहे