किराणा दुकानात वाइन विक्रीला विरोध गुरुदेव सेवा मंडळाचे तहसीलदारांना निवेदन

 

किराणा दुकानामधून मद्य विक्रीचा निर्णय शासनाने मागे घ्यावा.
गुरुदेव सेवकांची मागणी : शासनाला निवेदन सादर

धिरज कसारे //तालुका प्रतिनिधी कारंजा

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, कारंजा (घाडगे) च्या वतीने सोमवारी कारंजा (घा) तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. शेतकरी हिताचे कारण पुढे करून राज्याचा महसूल वाढवा म्हणून सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णया विरोधात गुरुदेव सेवकांनी रोष व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेव्श्वर महाराज अशा विविध संतांनी समाज निर्व्यसनी व्हावा यासाठी हाल अपेष्ठा सहन करून अभंग व किर्तनातून समाज प्रबोधन केले. तेव्हा महाराष्ट्र राज्याला व्यसन मुक्त राज्य करण्यासाठी तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम आखणे अपेक्षित होते. पण असे काहीही न करता या उलट शासनाचा महसूल वाढवण्याच्या हेतूने व काही वाईनरीज मालकाच्या हिताच्या दृष्टीने शेतकरी हिताचे कारण पुढे करून १०० चौ.फुटाचे सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) विक्रीचा निर्णय महाराष्ट्र मंत्री मंडळाने (बैठक क्रमांक ९८) दिनांक २७ जानेवारी २०२२ ला घेतलेला आहे.
सदर निर्णयामुळे रोजगार मागणाऱ्या वैफल्य ग्रस्त तरुणाच्या हातात वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) सहजरीत्या उपलब्ध करून दिल्या जाईल. ज्यामुळे समाजात गुंडप्रवृत्ती वाढून अराजकता निर्माण होईल. या निर्णयामुळे शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढून कायदा – सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, कारंजा (घाडगे) च्या वतीने किराणा दुकान व सुपर मार्केट मध्ये वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) विक्रीला मंत्रिमंडळाने दिलेले मंजुरी तत्काळ थांबवावी, अशी विंनती करण्यात आली आहे. सदरचा निर्णय परत न घेतल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा, इशारा या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत देण्यात आलेला आहे.
यावेळी तालुका सेवाधिकारी बाबाराव बारई,माजी ग्रामसेवाधिकारी जानराव लोखंडे, भीमराव बाळापुरे, देविदास चौधरी,रविकांत गाडरे, सागर बारई, अमर जसुतकर, अझहर शेख, दर्शन जाधव, प्रिया काळे, नंदा जसुतकर, ज्योती यावले, प्रज्ञा ढोले उपस्थित होते.