एनसीसी छात्र सैनिकांनी दिले शहिदांना मानवंदना

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

14 फेब्रुवारी हा दिवस पुलवामा येथील शहिदांना आदरांजली म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी सर्वात भ्याड हल्ला आपल्या सैनिकांवर करण्यात आला होता संपूर्ण देशभर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येते. गांधी विद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनी सर्व शहिदांना मानवंदना दिली मुख्याध्यापिका श्रीमती उषाताई नागपुरे मॅडम यांची उपस्थिती होती .तसेच यांची अधिकारी प्रमोद नागरे यांनी विद्यार्थ्यांना पुलवामा हल्ल्याची माहिती दिली.