पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कार चोरी करणाऱ्या चोरट्यास केले जेरबंद

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की गौरव राजेश व्यास यांचे काकांची आरती चौक येथील त्यांचे घरासमोर रोडचे बाजुला उभी असलेली मारुती अल्टो कार क्रमांक एमएच ३१/बीबी-६५९९ ही दिनांक १०-०२-२०२२ चे रात्र दरम्यान अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अप.क्र. १८९/२०२२ कलम ३७९ भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास सुरु असतांना पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन दिनांक १३-०२-२०२२ रोजी वर्धा-सेवाग्राम रोडवर नाकेबंदी करुन आरोपी रोशन संजय भोसले, वय २९ वर्ष, रा. अंतरगाव, पालोती, ता. कळंब, जि. यवतमाळ यास चोरीस गेलेल्या मारुती अल्टो कार क्रमांक एमएच-३१ / बीबी ६५९९ किंमत ५०,०००/- रु. सह ताब्यात घेवून वर नमूद गुन्हा आणला. उघडकीस

सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सत्यविर बंडीवार यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार संजय पंचभाई, सुनिल मेंढे, शाम सलामे, गणेश आत्राम सर्व नेमणुक पोलीस स्टेशन, वर्धा शहर यांनी केली.