४७,८२,३९९ रुपयाचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपी ला वर्धा शहर पोलिसांनी केली अटक

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

 

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की अमित रमेशकुमार पारख वय ४२ वर्षे, व्यवसाय पारख डाया ज्वेलर्स, रायपुर रा. रायपुर यांनी दि. १२/०२/२०२२ रोजी पोलीस स्टेशन, वर्धा शहर येथे तक्रार दिली की, त्यांचे पारख डाया ज्वेलर्स, रायपुर येथुन १४ आणि १८ कॅरेटचे सोन्यात डायमंड मढविलेले असलेले ७१ अंगठया व ८२ टॉप्स (कानातले) असे सोन्याचे दागिणे एकुण कि. ४७,८२,३९९/- रू किमतीचे दागीणे बैतुल (म.प्र.) येथे वितरीत करण्याकरीता प्लास्टीक चौकोणी डब्यात त्यांचे दुकाणात काम करणारा पुरुषोत्तम यादव याचे ताब्यात देवुन बैतुल (म.प्र.) येथे जाणेकरीता त्यास दि. ०९/०२/२०२२ रोजी रायपुर रेल्वे स्थानकावर सोडुन दिले होते.

त्यानंतर दि. १०/०२/२०२२ रोजी फिर्यादी यांना एका अनोळखी मो. क. वरून कॉल आला त्यावर पुरूषोत्तम यादव याने फिर्यादी यांना सागितले की, वर्धेला आला तो कसा आला त्याला आठवत नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी वर्धेला येतो असे सांगुन पुरूषोत्त्म यादव याला रेल्वे स्टेशन, वर्धा जवळ थांबण्यास सांगितले.

त्यानंतर दि. ११/०२/२०२२ व दि. १२/०२/२०२२ रोजी फिर्यादी यांनी पुरूषोत्तम यादव यांस पुन्हा विचारणा केली असता फिर्यादी यांना खात्री झाली की, त्यांचा नोकर पुरूषोत्तम यादव याचे जवळ बैतुल येथे नेवुन देण्याकरीता दिलेली सोन्याचे दागिण्याची बॅग कुणीतरी चोरी केली अशी फिर्यादीची खात्री झाल्याने फिर्यादी श्री. अमित रमेशकुमार पारख, वय ४२ वर्षे, व्यवसाय पारख डाया ज्वेलर्स, रायपुर रा. रायपुर यांचे लेखी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, वर्धा शहर येथे अप क २०५/२२ कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचे तपासात आरोपी महेश उर्फ सुदाम पांडुरंगजी गाठेकर, वय ३२ वर्षे, रा. पोद्दार बगीचा, स्विपर कॉलनी, वर्धा यास दि. १३/०२/२०२२ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याचे कडुन चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी दि. १५/०२/२०२२ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे..

सदरची कार्यवाही मा. श्री. प्रशात होळकर, पोलीस अधीक्षक सा. श्री. यशवंत सोळंकी, अपर पोलीस अधीक्षक सा. मा. श्री. पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री. सत्यवीर बंडीवार यांचे निर्देशान्वये पो. नि. श्री संजय गायकवाड़ स्था . गु. शा. वर्धा श्री गणेश वैरागी, स.पो.नि. श्री. प्रविण पाटील, पोलीस उपनिरीक्षक, पोहवा. सचिन इंगोले, संजय पंचभाई, सुभाष घावड, नापोकों / अनुप राऊत, किशोर साठोणे, दिपक जंगले, सुनिल मेंढे पोशि / राजेश ढगे, शाम सलामे, आकाश बांगडे, पवन निलेकर, राहुल भोयर सर्व नेमणुक पोलीस स्टेशन, वर्धा शहर यांनी केली.