सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक यांच्या निवासस्थानी सहकाऱ्यांची भेट

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

सामाजिक कार्यकर्ता मंगला ताई ठक यांची प्रकृती फारच गंभीर असल्या मुळे आज त्यांच्या सहकारी भगिनींनी त्यांना बघण्यासाठी त्यांच्या निवासी जावून भेट घेतली .
सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक या गेल्या 2018 पासून एका आजाराशी लढत आहे . बरेच उपचार केले परंतु आजाराने मंगला ताईं ची साथ सोडली नाही. त्यांना या आजाराचा भयंकर त्रास असून ही त्यांनी हार न मानता रोज आपल्या सामाजिक कार्यात व्यस्त राहल्या दर रोज चां त्यांचां दोन , तीन खेड्यांचा प्रवास आजही करतात व लोकांचा कामात मदत करतात .12 , 14 घंटे वर्क केल्याशिवाय त्या झोप घेत नाही .स्वतः आजारी असून देखील न हारता न थकता हसत मुखाने त्या लोका समोर वावरतात . बऱ्याच इलाजा नंतर डॉक्टरांनी शेवटचा पर्याय म्हणून ऑपरेशन शिवाय पर्याय नाही . असे सांगितले सध्या त्या उपचार घेत आहे . महीला भगिनींनी त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली व मंगला ताईंना त्यांच्या सहकाऱ्यांनी धीर दिला