बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीस पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने केले जेरबंद

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

#khabardarmaharashtra, letest online news, politics, social, education, sports, corona, crime#

दिनांक २९-०१-२०२२ ते ३०-०१-२०२२ चे रात्रदरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी फिर्यादी श्री प्रज्योत हुलके, रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट यांचे शेतातील टिनाच्या शेडच्या सिमेंटची भिंत तोडुन त्यामधुन एकुण ०६ बकऱ्या चोरल्या. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे हिंगणघाट येथे अपराध क्र. १८६/२०२२ कलम ४६१, ३८०, ३८१, ३४ भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेवून गुन्हे प्रकटीकरण पथकास आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर गुन्हयाचे तपासादरम्यान मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन आरोपी नामे १) संजय सुरेश टेकाम रा. मारेगाव, जि. यवतमाळ, २) सुनिल जयराम पिंपरे रा. वरद जि. यवतमाळ, ३) संदिप उत्तम खडसे रा. चंहादे, जि. यवतमाळ यांना अटक करून त्यांचेकडुन चोरीच्या गुन्हयात वापरलेला अॅटो व चोरीच्या बकऱ्या विकलेले नगदी पैसे असा एकुण जु.कि. ६४,५००/- रू. चा माल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट श्री. दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री. संपत चव्हाण, पोलीस स्टेशन, हिंगणघाट, यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, सुहास चांदोरे यांनी केली आहे.