आर्वी विधानसभा क्षेत्रात मनसेची आढावा बैठक

 

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

वर्धा/ आर्वी :येणाऱ्या जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणी व आगामी काळात करावयाची कामे,काही व्यक्तींचा पक्ष प्रवेश या दृष्टीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा क्षेत्र (*आर्वी,आष्टी,कारंजा*)येथील मनसे पदाधिकारी आढावा बैठक आर्वी विश्रामगृह येथे घेण्यात आली, या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित राहून *मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी* यांनी मार्गदर्शन केले, बैठकीचे आयोजन उपजिल्हाअध्यक्ष *विजय वाघमारे* यांनी केले होते, मनसेची शाखा ही पक्षाचा पाया असून त्या प्रत्येक गावात स्थापित होऊन त्या शाखेच्या माध्यमातून जनहितार्थ प्रश्नाला हाथ घालून त्याचे निवारण होण्यासाठी सतत प्रयत्न करा व या भागातील जनतेची मन जिंका तरच आपले उमेदवार विविध निवडणुकीत निवडून येतील , मनसेच्या मजबुतीसाठी प्रत्येक पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त सक्रिय राहावेअसे प्रतिपादन हेमंत गडकरी यांनी बैठकीत उपस्थित पदाधिकारी यांना केले,यावेळी उपजिल्हाअध्यक्ष *शंकर पोटफोडे,विजय वाघमारे, मनविसे वर्धा जिल्हाअध्यक्ष शुभम दांडेकर* यांनीही आपले मत व्यक्त केले, संचलन *संदीप धारपुरे* यांनी केले, बैठकीत कारंजा तालुका अध्यक्ष *सागर हिंगवे,सेलूचे विवेक धोंगडे, आर्वी शहर अध्यक्ष प्रतीक बावणे,देवा उईके, नितीन खुणे,अमोल राहणे,शुभम शिरपूरकर,कृनाल कोडवानी,एकनाथ ढोरे, विनोद वाघमारे,विकास डोळस, विपुल वाघमारे, बाळूभाऊ काळे,ऋषभ बुराडे, महेश बुरादिन,राजू कुरेकर,शुभम वाघमारे,* व इतर उपस्थित होते, या आढावा बैठकी नंतर हेमंत गडकरी यांनी आर्वी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक श्री.भानुदास पिजूरकर यांची सदिच्छा भेट घेतली