
जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला
आर्वी :स्थानिक आर्वी येथे आर्वी च्या मुली संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात आर्वी शहराचे नाव उंचावत आहे करीता आर्वी च्या क्रीडाप्रेमींना या मुलींचा खेळ पाहता यावा या हेतूने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये पुन्हा आर्वीच्या महिला हॉलीबॉल खेळाडूंनी प्रथम बक्षीस पटकावले स्पर्धेचे उद्घाटन आमदार दादारावजी केचे यांच्या हस्ते व वासू अग्रवाल, विजू भाऊ ढबाले, निलेश भाऊ देशमुख, यांची उपस्थिती होती व बक्षीस वितरण सोहळा पल्लवी ताई काळे, संजय थोरात, प्रकाश गुल्हाने यांच्या हस्ते पार पडला नेत्रदीपक यश मिळवलेल्या सर्व मुलींनी आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर यांना दिले यानंतर सुद्धा सर्वांचा सदिच्छा व आशीर्वाद मिळाल्यास या सर्व मुली संपूर्ण महाराष्ट्रभर आर्वीचे नाव उंचावले शिवाय राहणार नाही असा दृढ विश्वास कपिल ठाकूर यांनी व्यक्त केला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल गोडबोले, अनिल चव्हाण, सलीम भाई यांनी अथक परिश्रम घेतले