जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला
संपुर्ण महाराष्ट्राला हादरविणारावून सोडणाऱ्या हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका अंकिता जळीतकांड शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आज बुधवारी ९ फेब्रुवारीला आरोपी विरोधात आरोप सिद्ध झाले असून या जळीतकांड प्रकरणात आरोपीस खुनाच्या शिक्षेत दोषी ठरविण्यात आले आहे.याता या खटल्याचा निकाल उद्या गुरुवारी १० फेब्रुवारीला घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांनी दिली आहे.आज या खटल्याचा निकाल येईल हि अपेक्षा सर्वांना असल्याने साऱ्या महाराष्ट्रील जनतेचे लक्ष निकालाकडे लागले आहे.११.३० मिनिटांनी आरोपीला चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले आहे.यावेळी सरकारी पक्षाचे वकील ॲड उज्वल निकम, आरोपी पक्षाचे वकील ॲड भूपेंद्र सोने न्यायालयात हजर झाले आहे.याच बरोबर पिडीचे आई-वडील सुध्दा न्यायालयात दाखल झाले होते. याठिकाणी कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.आरोपी विरोधात आरोप सिद्ध झाले असून या जळीतकांड प्रकरणात आरोपीला खुनाच्या शिक्षेत दोषी ठरविण्यात आले आहे.याता या खटल्याचा निकाल उद्या गुरुवारी १० फेब्रुवारीला येणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांनी दिली आहे.