20 किलो तांब्याच्या पट्ट्या चोरणाऱ्या चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या एकूण 340,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

 

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की अकबर अफसर खान वय 28 वर्ष रा. वार्ड क्र. 18 गुलजारी प्लॉट पुलगाव ता. देवळी जि. वर्धा यांनी दिनाक 20/01/2022 रोजी पो.स्टेशन ला तोंडी रिपोर्ट दिला की सि ए डी कॅम्प पुलगाव येथुन नमुद आरोपीतांनी तांब्याच्या पट्ट्या 20 किलो किंमत 20000/ रू चा माल गाडी क्र एम एच 27 ए आर 0750 मधे नेला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला

सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री. शैलेश शेळके  यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अमंलदार पो.हवा. खुशालपंत राठोड, पो.ना. बाबुलाल पंधरे, जयदीप जाधव, मुकेश वांदिले हे तपास करीत असतांना पो.स्टे. हद्दीतील सराईत गुन्हेगाराना ताब्यात घेवुन विचारपुस करून मुखबिर मार्फत प्राप्त माहीती वरून आरोपी क्र.01) पंकज ओमप्रकाश शितल वय 40 वर्ष 2) भुषन अंबादास भोकरे वय 26 वर्ष दोन्ही रा वार्ड क्र 18 गुलजारी प्लॉट पुलगाव ता. देवली जि. वर्धा यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातुन 1) ताब्याच्या पट्या 20 किलो किंमत 20,000/- रुपये 2) एक जुनी वापरती MARUTI SUZUKI EECO कंपणीची ग्रे कलरची जिचा क्र. MH-27 AR 0750 अशा वर्णनाची जिची किंमत अंदाजे 3,20,000/- रुपये 3) एक लोखडी आरीपत्ता बिना मुठवाला फ्रेमसह कि. 50/- रुपये असा ए. जु.की. 340,050/- रु.चा. माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव श्री. गोकुळसिंग पाटील यांचे मार्गदर्शनात श्री. शैलेश शेळके पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणाचे अंमलदार स.फौ. खुशालपंत राठोड, नापोकाँ. बाबुलाल पंधरे, महादेव सानप, जयदिप जाधव, मुकेश वांदिले यांनी केली आहे.