AIMIM अध्यक्ष असोदोद्दीन ओवेसी यांना Z + सुरक्षा देण्या करिता निवेदन

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

दि.०३/०२/२०२२ रोजी AIMIM पार्टीचे सर्वेसर्वा तथा बॅरिस्टर खा. असोदोद्दीन ओवेसी यांच्यावर छिजारसी टोल गेटवर काही समाजकंटक लोकांनी त्यांच्यावर जिवघेणी हल्ला केला. परंतु सुदवाने ते त्यांच्यातुन वाचले व त्यांच्या चार राऊंड फायर झाले व त्यांना जिव घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही दिल्ली येथे त्यांच्या राहत्याघरावर विघातक हल्ला करण्यात आला होता. असे वारंवारच्या हल्लामुळे देशातील CBI व Intelligence अकार्यक्षम झाल्याचे संदेश सर्वदुर समाजात पसरत आहे. तसेच ज्या व्यक्तीला उत्तम संसदपटट्टु म्हणुन पुरस्कारीत केले व एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतांना त्यांच्या सोबत अशा निर्दनीय घटना घडने ही बाब अत्यंत संशयकारक आहे या सदरील घटनेचा आम्ही AIMIM पक्षातर्फे तिव्र निषेध नोंदवत असून आमची मागणी आहे की, खा. असोदोद्दीन आवेसी साहेब यांना Z+ Security गृहमंत्रालयाकडून त्वरीत देण्यात यावी तसेच या हल्यामागील दोषींना त्वरीत अटक करण्यात येऊन त्यांना कठोर शासन करण्यात यावे तसेच आगामी उत्तर प्रदेश राज्यात होणाऱ्या निवडणुका भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पडाव्यात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने उत्तर प्रदेश राज्यात केंद्रीय सुरक्षा बल पाठविण्यात यावे. कायदा व सुव्यवस्था कायम करण्यात यावी म्हणुन आज रोजी लोकशाही मार्गाने लढा देऊन आम्ही जिल्हाधिकारी मार्फत निवेदन आपल्या सेवेत पाठवित आहोत व जाहिर निषेध व्यक्त करीत आहोत. असे निवेदनात म्हटले आहे