गडचिरोली जिल्हयात आज168 कोरोनाबाधित

गडचिरोली,दि.05: आज गडचिरोली जिल्हयात 1028 कोरोना तपासण्यांपैकी 168 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 162 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 35740 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 33889 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1088 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 763 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.82 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.04 टक्के तर मृत्यू दर 2.13 टक्के झाला आहे.
आज नवीन 186 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 30, अहेरी तालुक्यातील 07, आरमोरी तालुक्यातील 04, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 26, धानोरा तालुक्यातील 07, एटापल्ली तालुक्यातील 15, मुलचेरा तालुक्यातील 02, सिरोंचा तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील 21 आणि वडसा तालुक्यातील 07 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 162 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 59, अहेरी तालुक्यातील 06, आरमोरी तालुक्यातील 06, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 15, धानोरा तालुक्यातील 09, एटापल्ली तालुक्यातील 05, मुलचेरा तालुक्यातील 08, सिरोंचा तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील 06,आणि वडसा तालुक्यातील 37 जणाचा समावेश आहे.