पाणीपुरवठा बंद केलेल्या उपसरपंचावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

 

बातमी संकलन // उमंग शुक्ला

अमरावतीच्या सावंगी मग्रापूर गावातुन संतापजनक घटना समोर आलेलीहोती. अनुसूचित जातीच्या नागरिकांचा महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.

आता या प्रकरणी उपसरपंच जोरावर पठाण यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाण्यासाठी या नागरिकांनी गावाबाहेर असणाऱ्या विहिरीजवळ ठाण मांडले आहे. तसेच अनेक नागरिकांनी पाणी नसल्यामुळे गाव सोडलं आहे. या नागरिकांच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असून तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी खोदकाम सुरु करण्यात आले आहे. परंतु पाणीपुरवठा सुरु होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशा भूमिकेवर आंदोलन करणारे नागरिक ठाम आहेत.