अखेर त्या परिवारांना मिळाला न्याय मिळाले नियुक्ती आदेश

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

 

श्री.अशोक सोनोने, व श्री सुनील सुरेशराव अवचार हे नगर परिषद सेवेत कार्यरत असताना मय्यत झालेले होते.त्यांच्या मृत्यू नंतर नियमानुसार त्यांचे वारस श्री. स्वप्नील अशोक सोनोने व श्री. आशिष सुरेशराव अवचार ह्यानी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्या करिता नगर परिषदेत विनंती अर्ज सादर केलेला होता

त्या अन्वये समाज बांधिलकी चा व त्यांच्या परिवाराचा विचार करून मा.हरीश धार्मिक प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी आर्वी, मा देवळीकर साहेब मुख्याधिकारी न.प.,श्री. रणजीत पवार उपमुख्याधिकारी ,श्री रुपेश जळीत लिपीक तसेच कर्मचारी संघटने चे जिल्हाध्यक्ष श्री. संजय आंभोरे यांनी सदरच्या प्रकरणात सतत पाठपुरावा करून जवळपास 5 ते 6 वर्षा नंतर सरतेशेवटी (श्री. सोनोने, श्री.अवचार )या दोन्ही व्यक्तीची अनुकंपा तत्वावर नगर परिषदेत नियुक्ती.ची प्रक्रिया पारपाडून आणन्यांत यश प्राप्त केले. व आज दिनांक 4/2/2022 रोज शुक्रवार ला दोघांना नगर परिषदेत अनुकंपा तत्वावर मा. संजयभाऊ अंभोरे जिल्हाध्यक्ष कर्मचारी सांघटना,यांच्या समक्ष मा.रणजीत पवार साहेब उपमुख्याधिकारी , यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करून रुजू करण्यांत आले ह्या वेळेस मा.बंग साहेब,लेखापाल, मा.निकाजू साहेब,अभियंता बांधकाम विभाग, मा.चोचमकर साहेब, स्वच्छता अभियंता,श्री. सुनील आरीकार आरोग्य निरीक्षक मा. चांदोरे मैडम, श्री.भुवनेश्वर पीडीयार लिपीक लेखा विभाग,श्री.रुपेश जळीत लिपीक=ममता अवसरे लिपीक,श्री. महेंद्र शिंगाने स.जमादार, श्री. अरुन पंड्या , श्रीमती सलीमाबी शे. बशीर,श्री.शिवाजी चिमोटे त्याच प्रमाणे श्री. सुशील चावरे उपाध्यक्ष सफाई कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष आदी कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

त्याच प्रमाणे भविष्यात त्यांना किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही व संघटना सदैव सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंभीर पणे उभी आहे व उभी राहील. अशी ग्वाही संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय अंभोरे यांच्या वतीने देण्यात आली..