नवीन आष्टी येथे पोत्यात सापडला मृतदेह

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

आष्टी (शहीद)
आष्टी तालुक्यातील नवीन आष्टी येथील जगदीश भानुदास देशमुख वय वर्ष 35 याचा मृतदेह त्याच्याच घरामागे अंदाजे 100 फूट अंतरावर पोत्यात आढळून आला सविस्तर बातमी या प्रमाणे आहे, नवीन आष्टी येथील व्यवसायाने राजकाम करणारा मृतक जगदीश देशमुख यांचा दिनांक 04फेब्रुवारी रोजी सकाळी 6:00 वाजता च्या सुमारास त्याच्याच घरामागच्या टेकाडे नामक यांच्या घरासमोरील नालीच्या कडेला बारदाण्याच्या पोत्यात आढळून आला. नेमका मृत्यू कश्यामुळे झाला हे गूढ रहस्य अजूनही कायम आहे तर घटनास्थळी प्रथम दर्शनी पाहता घातपात असल्याचा स्थानिक नागरिकाकडून कुजबुज होत आहे. सदर प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने पोलीस प्रशासनापुढे आव्हान असून पुढील तपास ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक देरकर, पो. हवा. शेख नबी, ना. पो. शी. बालू वैरागडे, पो. शी. संजय बोकडे, राहुल तेलंग, नंदकिशोर वाढवे, अश्विन ढाले, माधुरी दवंडे पुढील तपास करत आहे. सदर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे पाठविण्यात आला आहे