जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला
#khabardarmaharashtra, letest news,social, politics, korona, crime#
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे दि.२८.१०.२०२१ रोजी फिर्यादी श्री रोशन विलास वांदिले, रा. वार्ड क्र. २, सेलु यांच्या सेलु बस स्टॉप जवळ आधार केन्द्रामधील एक डेल कंपनीचे संगणकाचे जुने वापरते सि.पी.यु. किंमत २०,००० रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन सेलु येथे अप.क्र. ६२०/२०२१ कलम ३८० भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच दि.३१.१२.२०२१ रोजी सहकारी शेतकरी समिती, सेलु येथुन एक लिनोओ कंपनीचे मॉनीटर जुने वापरते कि. ५०००/- रु. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादी श्री मनोज मारोतराव नाईक, रा. रमणा, ता. सेलु यांनी पोलीस स्टेशन सेलु येथे दिलेल्या तक्रारीवरून अप.क्र. ८१३/२०२१ कलम ३८० भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर दोन्ही गुन्ह्याचे तपासात अज्ञात आरोपी व मालाचा शोध घेत असता मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरुन सेलु येथील एका विधिसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्यास गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता सदर बालकाने वर नमूद दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. सदर विधीसंघर्षीत बालकाचे ताब्यातुन वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल १) एक डेल कंपनीचे संगणकाचे जुने वापरते सि.पी.यु. किंमत २०,००० रु., २) एक लिनोओ कंपनीचे मॉनीटर जुने वापरते कि. ५०००/- रु. असा मुद्देमाल हस्तगत करुन वर नमूद दोन्ही गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री. पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री. रविन्द्र गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, कपील मेश्राम, लेखा राठोड सर्व नेमणुक पो.स्टे. सेलु यांनी केली.