स्वच्छता दूत म्हणून आर्वी शहराकरिता प्रमोद नागरे यांची नियुक्ती

 

नगरपरिषद आर्वी द्वारे गांधी विद्यालय मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक तसेच एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांची माझी वसुंधरा अभियान 2.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण करतात घेण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पर्यावरण दूत स्वच्छता दूत म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
दिनांक 1 फेब्रुवारी रोजी प्रशासक नगर परिषद आर्वी श्री. हरिष जी धार्मिक , मुख्याधिकारी विजय देवडीकर, उपमुख्य अधिकारी आरोग्य खात्यातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रमोद नागरे यांना नियुक्ती आदेश तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आपले शहर स्वच्छ, सुंदर हरित ठेवण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच या सर्वांचे प्रयत्न नागरिकांचे नेतृत्व करणारे तसेच विविध कार्यक्रमांमध्ये स्वच्छतेसंबंधी सहभाग घेऊन नागरिकांमध्ये जागृत करण्याकरता या पदाची नियुक्ती करण्यात येत असते, नगरपरिषद मधील श्री सुनील आरेकर श्री सुरेंद्र चमत्कार श्री शांतनु भंडारकर श्री सौरभ निखारे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते या नियुक्तीबद्दल प्रमोद नागरे यांनी सर्वांचे आभार मानले.